न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२४) :- सांगवी फाट्याकडुन वाकड वाय जंक्शनकडे जाणा-या रस्त्यावर (दि. २९) रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास ट्रक भरधाव वेगात, हयगयीने व बेदरकारपणे चालवला. बी.आर.टी. रोडच्या संरक्षक लोखंडी डिव्हायडर व सिमेंन्टचे कठडे तसेच पिंपरी चिंचवड मनपाचे एक गॅन्ट्री पोल व एक स्ट्रीट लाईट पोलला वेगात धडक दिली. त्यामुळे सार्वजनिक मालमत्ता नुकसानीस आरोपी वाहनचालक कारणीभुत झाला.
फिर्यादी गिरीधर केशव कोरे (वय २५ वर्षे धंदा नोकरी कनिष्ठ अभियंता विद्युत) यांनी आरोपी अंकुश महादु बंदुके (वय ३२ वर्षे धंदा चालक पत्ताः कुरकुम ता. दौंड जि. पुणे.) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
सांगवी पोलिसांनी १८० / २०२४ सार्वजनिक संपत्ती क्षती निवारण अधिनियम १९८४ चे कलम ०३, भा.द.वि. कलम २७९, ४२७, सह मो. व्हे. अॅक्ट. कलम १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा जराड तपास करीत आहेत.