न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२४) :- तीघजण रेस्टो अॅन्ड बारमधून पाच बिअर मागुन, बिअरचे पैसे न देता हॉटेलमधुन निघुन गेले. याबाबत फिर्यादींनी आरोपी क्र २ याच्या वडीलांना हा प्रकार सांगीतला. त्याचा राग आल्याने आरोपी क्र ४ याने फिर्यादीच्या मॅनेजरला ‘अरमान के पिताजीको तुमने फोन करके हमारी कप्लेंट किया है ना, देखो आज रात १२ बजे अमूतको मारके हॉटेल जला देंगे’ अशी धमकी दिली.
तसेच फिर्यादी हे त्यांच्या रेस्टो बारच्या पाठीमागील जागेत मारुती स्विफट कार पार्कंग करीत असताना, एका काळया रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या आरोपी क्र २,३ व ४ यांनी फिर्यादी कारमधुन खाली उतरत असताना आरोपी क्र २ व ३ यांनी माझी वडीलांकडे तक्रार करतो का, आता तुला दाखवितो असे म्हणुन फिर्यादींना शिवीगाळ करीत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी आरोपी क्र २ याने ‘मी कासारवाडीचा भाई आहे, माझेकडे पैसे मागतो काय, थांब आता तुला दाखवीतो’ अशी धमकी देत फिर्यादींच्या शर्टाच्या खिशात ठेवलेले २,७०० रुपये जबरदस्तीने काढुन घेतले. तसेच आरोपी यांनी हॉटेलच्या दरवाजा समोर येवुन ‘तु आमची तक्रार करतो काय, हॉटेलचे बाहेर ये, नाहीतर तुझी गाडीच फोडतो’ अशी फिर्यादींना धमकी देत शिवीगाळ केली. त्याचवेळी आरोपी क्र १ याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादींच्या मारुती स्विफट कारच्या पाठीमागील काचेवर, साईडच्या काचेवर तसेच समोरील काचेवर मारुन कारच्या काचा फोडल्या. तसेच आरोपी क्र २ व ३ यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने तर आरोपी क्र ४ याने त्याचे हातातील लाकडी दांडक्याने व आरोपी क्र ५ याने तेथे पडलेला दगड उचलुन फिर्यादींच्या गाडीच्या कारवर मारुन कारचे नुकसान केले. त्यानंतर आरोपी यांनी आम्ही कासारवाडीचे भाई आहोत, आमची पोलीसांमध्ये तक्रार केली तर आम्ही तुझे हॉटेल चालु देणार नाही अशी फिर्यादींना धमकी देत शिवीगाळ केली आणि ठिकाणाहुन निघुन गेले, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. २८) रोजी रात्री ८:०० ते (दि. २९) रोजी ००:३० वाजता वरुण रेस्टो बार, मोटे बिल्डींग, तळमजला, केशवनगर कासारवाडी येथे घडला.
फिर्यादी अमूत अण्णय्या शेटटी (वय ३६ वर्ष, धंदा हॉटेल व्यवसाय) यांनी आरोपी १) ऋषीकेश ऊर्फ मुंगळया विश्वनाथ मोटे (वय २० वर्ष, धंदा शिक्षण), २) अरमान कपील देशमुख (वय २१ वर्षे रा कासारवाडी), ३) रोहीत कदम, ४) अभी मोरे, व ५) शिवा पवार (सर्व रा. कासारवाडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी २८०/२०२४ भा.दं.वि कलम ३९५,३३६, ४२७, सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ सह क्रिमीनल लॉ अमेडमेंट अॅक्ट ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपी क्र १ याला अटक केली आहे. पोउपनि मदेवाड तपास करीत आहेत.