न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२४) :- मोरवाडीत ग्रेड सेपरेटरमध्ये हवाई दलाचा टेम्पो उलटला. दुचाकीस्वाराला वाचविताना टेम्पो उलटल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मंगळवारी (दि. ३०) रोजी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गाववरून हवाई दलाचा टेम्पो मुंबईच्या दिशेने जात होता. टेम्पोला एक दुचाकीस्वार आडवा आला. त्याला वाचविताना टेम्पो उलटला. टेम्पोतून रस्त्यावर ऑइल गळती झाली.
रस्त्याच्या मध्यभागी टेम्पो उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. खराळवाडीतून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पिंपरी पोलीस आणि वाहतूक विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाला बोलविण्यात आले. पाण्याने रस्ता धुवून काढला आहे.