न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२४) :- महावितरणच्या भोसरी शाखेतील सहाय्यक अभियंत्याला (वर्ग २) ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. कंपनीचा विद्युत भार वाढविण्यासाठी काम करण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडी अंती ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक अभियंता मोरे यांना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे पुढील तपास करीत आहेत.