न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२४) :- १ मे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनोत्सवनिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, महापालिका कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. तसेच याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांनी मतदान करण्याबाबत शपथ घेतली