- दोन वर्षांची चिमुरडी बचावली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मे २०२४) :- पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डनजवळील साई ड्रीम्स या सोसायटीमधील c 402 या फ्लॅटला रविवारी दुपारी आग लागली होती. आगीमध्ये हॉलमधील साहित्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, किचनमधील गृहपयोगी साहित्य जळून खाक झाले.
माहिती मिळताच अग्निशमन विभागाचा पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र, रहाटणी थेरगाव उप अग्निशमन केंद्राचा बंब दाखल झाला. आग व धुर एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की त्या ठिकाणी BA SET परिधान करून अग्निशामक जवानांनी आग नियंत्रणात आणण्याचे कार्य केले. आगीवर नियंत्रण मिळवत असताना एकाच वेळी वरील मजल्यावर धुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्याचे काम प्राधान्याने त्यांनी केले. या धुरामध्ये अडकलेली 2 वर्षाची चिमुरडी चार्वी घवाणे हिला धुरातून सुखरूपपणे बाहेर काढण्याचे काम विकास कुटे या (TF) केले. तसेच सहाव्या मजल्यावर ती असलेल्या 604 या फ्लॅट चे दरवाजे तोडून त्या दिव्यांग वयोवृद्ध आजी आजोबांना मोकळ्या जागेत हलवण्यात आले. आगीवर 2 गाड्या पाणी मारून आग पूर्णपणे विझविण्यात आली. जखमी व जीवित हानी नाही.
या मोहिमेत विजय घुगे (PSO), विकास नाईक(लि फा), विकास तोरडमल (लि फा), अनिल वाघ (फा), अमोल चिपळूणकर, पाठक, शुक्ल (TSO), कुटे (TF), कंठाळे (TF), साबळे (TF) आणि इतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.