न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मे २०२४) :- एकमेकांशी संगणमत करुन दोघांनी ‘आम्ही तुमचे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक करण्यासाठी डी मॅट काढले आहे’ असे सांगुन सुरवातीला काही दिवस फिर्यादी व त्यांचे सहकारी मित्र व इतर ३७ जणांना परतावा दिला.
पैसे गुंतवणुक करण्यासाठी फिर्यादीकडुन एकुण १० लाख ३८ हजार रुपये व त्यांचे इतर ३७ सहकारी मित्र यांचेकडुन १ कोटी १ लाख ९० हजार रुपये असे एकुन १,१२,२८,००० रुपये चेकव्दारे व रोख स्वरुपात वेळोवेळी घेतले. त्या सर्वांचे डिमॅट अकाऊंट न काढता त्यांना त्यांचे डी मॅट अकाऊंट ओपन केल्या बाबतचे एलकेपी कंपनीचे खोटे सर्टिफिकेट देत सर्वांची फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार सन २०१५ पासुन ते आजपर्यंत टाटा टेल्को गेटचे समोर, पुर्णानगर, चिंचवड येथे घडला. फिर्यादी सुहास बजरंग शेजवळ यांनी आरोपी १) प्रशांत सिताराम खाडे, २) सिताराम खाडे (रा. ऐनकुळ, ता. खटाव जि सातारा) यांच्याविरुध्द फिर्याद नोंदविली आहे. चिखली पोलिसांनी २७२/२०२४ भा.दं.वि कलम ४०६,४२०,३४ प्रमाणे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुळीक तपास करीत आहेत.