न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२४) :- सोन्याच्या दुकानात आरोपी सुमारे ४ वर्षांपासून मॅनेजर म्हणून काम पाहत होता. आरोपीने फिर्यादी यांच्या नकळत ११,९४,६८० रु किं चे १९७ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेटच्या सोन्याच्या बांगडया, चेन असे सोन्याचे दागिने व १२,८०० रु रोख रक्कम चोरी करून पळून गेला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि.०४/०३/२०२४ ते दि. ०७/०३/२०२४) हेमू कलानी मार्केट, डिलक्स रोड, मुचूट फायनान्स समोर, पिंपरी येथे ईश्वरी ज्वेलर्स या दुकानात घडली. फिर्यादी महेश अशोक खेमचंदानी (वय ४० वर्षे, धंदा व्यवसाय, रा. पिंपरी) यांनी आरोपी रामचंद्र दास ऊर्फ प्रमोद (वय ३३ वर्षे, मुळ रा. मामाजी का ठाण, सुमेर, पाली, राजस्थान) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ४३५/२०२४ भा.दं.वि कलम ३८१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि रायकर पुढील तपास करीत आहेत.