न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२४) :- दोन वर्षासाठी तडीपार केलेल्या आरोपीने कोणतीही कायदेशीर पुर्व परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग केला. स्वत:च्या ताब्यात २०० रु किं चा लोखंडी कोयता बाळगला.
दरम्यान (दि.०७) रोजी दुपारी १.३० च्या सुमारास मुळा मुठा नदीच्या कडेला, पवार वस्ती, दापोडी येथे बॉबी ऊर्फे चार्ल्स शेखर पिल्ले (वय २३ वर्षे, रा. नालंदा बुध्द विहारासमोर, पवार वस्ती, दापोडी) येथे निदर्शनास आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
भोसरी पोलिसांनी ३०६/२०२४, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, व आर्म अॅक्ट ४ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स पो फौज बोयणे पुढील तपास करीत आहेत.