न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२४) :- ‘तु बहोत पैसा कमाने लगा है’ असं आरोपी क्र ४ फिर्यादी हे घरी जात असताना त्यांना थांबवून म्हणाला. त्यावेळी आरोपी क्र. २ याने हातामध्ये दगड घेवुन फिर्यादीच्या डोक्यामध्ये व डाव्या कोप-यावर मारुन त्यांना जखमी केले.
दरम्यान आरोपी क्र. १, ३ व ४ यांनी त्यांना हाताने मारहाण केली. तसेच मारहाण करीत असताना झटापटी मध्ये फिर्यादीच्या गळयातील ८.५ ग्रॅमची सोन्याची चैन खाली पडुन गहाळ झाली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि. ०८) रोजी सायंकाळी ०५.०० वा. सुमारास गोदरेज कन्स्ट्रक्शन साईटच्या गेटच्या बाहेर, जुना पुणे – मुंबई हायवे, आयसीसी टॉवर शेजारी, पिंपरी येथे घडली.
मायकल डॉमनी फर्नांडीस यांनी आरोपी १) जमीर (अंदाजे वय २७ पुर्ण नाव माहीत नाही रा. कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळ, कासारवाडी), २) गुड्या (अंदाजे २८ पुर्ण नाव माहीत नाही), ३) आलम शेख (अंदाजे ३२ वर्षे), ४) आझर अंदाजे ३३ (पुर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ४३९/२०२४ भा.दं.वि. कलम ३२४,३४ प्रमाणे चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. सपोफौ उबरे पुढील तपास करीत आहेत.