- सिद्धीविनायक कन्सल्टन्सी सर्व्हसेसकडून ‘जॉब फ्रॉड’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२४) :- दोघांनी संगनमत करुन २५ वर्षीय तरुणीला कंपनीमध्ये ४ लाख रुपये अॅनुअल पॅकेजची नोकरी लावतो, असे अमिष दाखवले. बनावट ऑफर लेटर मेलवर पाठवुन तरुणीकडुन २ लाख रुपये रोख व बँकेद्वारे स्विकारले. नोकरी लावुन दिल्याचे भासवत तरुणीची फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार जाने २०२४ ते आजपर्यत सिद्धीविनायक कन्सल्टन्सी सर्व्हसेस वाकड व बॅक्सेस प्रा. लि. हिंजवडी येथे घडला. २५ वर्षीय महिलेने आरोपी १) प्रदिप उर्फ विक्रांत राजु भोसले (रा. आळंदी), २) परेश देविदास पाटील (रा. चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ६२४/२०२४ भादवि क. ४०९,४१९, ४२०,४६५, ४६८,४७१, ३४ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि गिरी पुढील तपास करीत आहेत.