न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे २०२४) :- अज्ञात कारणावरुन अज्ञात इसमाने २५ वर्षीय तरुणाचा डोक्यात सिमेंटचा गट्टू घालुन गंभीर जखमी करुन त्याचा खून केला आहे. ही घटना (दि. १०) रोजी दुपारी ११:५० वाजताचे सुमारास वुडसविला फेज २ सोसायटी गेट समोर सार्वजनिक रस्त्यावर, बो-हाडेवाडी मोशी येथे हा प्रकार घडला.
दरम्यान अज्ञात आरोपी निष्पन्न झाला असून संदिप उर्फ सँडी दशरथ देशमाने (वय २५ वर्षे रा. केशवनगर, कासारवाडी) असं अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २४५/२०२४ भा.दं वि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि आरदवाड पुढील तपास करीत आहेत.











