न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे २०२४) :- दोन गावरान मिक्स जर्सी जातीच्या बैलांना दोरीने करकचुन दाटीवाटीने बांधले. जनावर वाहतुकीचा परवाना नसताना त्यांना छोटा हत्ती टेम्पोतून कतल्लीसाठी घेवून जात असताना पोलिसांच्या निदर्शनास आले.
ही घटना (दि. ११) रोजी दुपारी १.०० वाजता रोहकल फाटा, डायमंड चौक, ता खेड जि पुणे येथे घडला.
आरोपी १) सुखदेव लक्ष्मण टोपे (रा वाकी बुद्रुक ता खेड जि पुणे), २) तुकाराम विठोबा टोपे (वय ५४ वर्षे रा वाकी बुद्रुक, पत्रेवस्ती ता खेड जि पुणे) यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात ३२६/२०२४ प्राण्याचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११(१) (अ),११)१) (ड), सह महाराष्ट प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ), ५ (ब) मोटार वाहन कायदा कलम १२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोना साबळे पुढील तपास करीत आहेत.











