न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२४) :- भारतीय योग संस्थानच्या वतीने कोकणे चौक येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे लहान मुलांसाठी निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी या शिबिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची योगासने आणि प्राणायाम शिकविण्यात आले.
या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने मुले व मुली सहभागी झाले होते. या व्यतिरिक्त विविध प्रकारचे जुने खेळ जे लोप पावत चालले आहेत त्यांची ओळख करून दिली व मुलांनी हे सर्व खेळ खेळून आनंद घेतला.
छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे भारतीय योग संस्थानच्या वतीने कायमस्वरूपी निःशुल्क योग अभ्यास सर्वांसाठी घेतला जात आहे. हे शिबिर आयोजित करण्यात जानकी शिंदे, तंकमनी तंबान, सुजाता मोरे, छाया राऊत, सविता राजगुडे, छाया लोंढे, शानु शुक्ला व रहाटणी केंद्रातील सर्व साधकांनी सहकार्य केले.















