न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२४) :- टेम्पो ट्रॅव्हलर्स (गाडी नंबर जी.जे.०१/के.टी.५९६०) वरील चालकाने वाहन भरधाव वेगाने, हयगईने, अविचारने, निष्काळजीपणे रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन चालवले. पादचारी वृद्ध व्यक्तीला पाठीमागुन जोराची धडक देऊन अपघात केला.
अपघातात पादचारी वृद्धाच्या डोक्याला, छातीला व पायाला गंभीर दुखापत होऊन पादचारी व्यक्ती सिताराम खेत्रुजी उईके (वय ७७ वर्षे रा. बोराटेवस्ती, मोशी) यांच्या मृत्युस आरोपी कारणीभुत झाला आहे. ही घटना (दि.१४) रोजी ३.०० वाचे सुमारास पुणे नाशिक हायवे रोडवर, अर्बुदा फर्निचर दुकानासमोर, बनकरवस्ती पूर्व मोशी येथे घडली.
याप्रकरणी मयताचा मुलगा फिर्यादी रविंद्र सिताराम उईके (वय ४१ वर्षे, रा. बोपखेल) यांनी आरोपी परेश सोमाभाई पटेल (वय ४५ वर्षे रा. वडोदरा राज्य गुजरात) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २४८/२०२४ भादवि कलम २७९,३३८, ३०४(अ) सह मो वा कायदा कलम १८४,११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पी डी आहिरे तपास करीत आहेत.












