न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२४) :- गावाकडे न जाण्याच्या कारणावरुन मित्राने धारधार लोखंडी कटर गळयावर व छातीवर मारून तरुणाला गंभीर दुखापत केली आहे. हा प्रकार (दि १५) रात्री १०.०० च्या सुमारास माऊली डेअरी जवळ, शास्त्री चौक, आंळदी रोडवर, भोसरीत घडला.
फिर्यादी तरुण बाबासाहेब ऊर्फ छोटु पांडुरंग सागर (वय २३ वर्ष, धंदा केटरींग) याने आरोपी दिपक अशोक कांबळे (वय ३२) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ३१६/२०२४, भा.द.वि. कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि शेख पुढील तपास करीत आहेत.











