न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२४) :- चारचाकी गाडी रस्त्यावर पार्क केल्याच्या कारणावरुन तिघांनी संगणमत करुन तरुणाला लोखंडी रॉड, हाताने व लाथाबुक्क्यांनी उजव्या खांद्यावर, उजव्या दंडावर व डोक्यात कानाच्या पाठीमागे मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे.
हा प्रकार (दि. १०) रोजी सायंकाळी ७.३० वाजता सोमनाथ मोबाईल शॉपीच्या समोर, बालाजीनगर, भोसरी येथे घडला. फिर्यादी बाबासाहेब काळूराम जाधव (वय ३० वर्ष) यांनी आरोपी १) अजय / सोन्या फिरोज रणदिवे (वय २५ वर्षे), २) सचिन दिपक गायकवाड (वय २४), ३) अजय बाबासाहेब धोत्रे (वय २४ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद नोदविली आहे.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी २५१/२०२४ भा.दं. वि. कलम ३२६,३२४,३२३,५०४,३४ प्रमाणे तिघांवर गुन्हा दाखल केला असून आरोपी क्रं १ व २ अटक आहेत. के. एस. पठारे, सपोनि तपास करीत आहेत.











