न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२४) :- पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे त्याचप्रमाणे पर्यावरण, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, पोलिस मित्र, नागरी सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असणारे विजयकुमार पाटील ह्यांना देशातील नामवंत विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळणे हे आपल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी भूषणावह बाब नक्कीच आहे, असे मत श्री स्वामी समर्थ अनंत मठ रहाटणीच्या कार्यवाह सदस्य अॅड. विद्या पंडित यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र दळवी, अभिजीत पंडित, संतोष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री स्वामी समर्थ अनंत मठ रहाटणी यांच्या वतीने पीएचडी चा बहुमान प्राप्त होणारे सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार पाटील यांचा चिंचवड येथे आज सन्मान करण्यात आला.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविंद्र दळवी म्हणाले,” शहरातील अनेक सामाजिक आंदोलनामध्ये सहभागी असणारे विजयकुमार पाटील यांच्यासोबत सहभागी होऊन कार्यरत असताना त्यांची समाजाबद्दल असलेली तळमळ जवळून अनुभवलेली आहे. २०१७ मधील घर बचाव आंदोलनाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांना सामाजिक क्षेत्रातील मिळालेली ही मानद डॉक्टरेट त्यांच्या सामाजिक कार्याची पोचपावती आहे.
या प्रसंगी रहाटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, रावेत, आकुर्डी, पिंपळे सौदागर, गुरुद्वारा परिसर, चिंचवडेनगर बिजलीनगर, निगडी प्राधिकरण, चिखली शाहुनगर,कासारवाडी परिसरातील नागरिकांनी सुद्धा डॉ. पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.












