न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२४) :- मावस आणि चुलत भावासोबत तरुण मोबाईलमध्ये गेम खेळत होता. दरम्यान तीन अनोळखी इसम तिथे गाडीवरून आले. त्यापैकी दोघांनी तरुणाला शिवीगाळ करत मारझोड केली. तसेच दुसऱ्याने शिवीगाळ करुन हाताचापटीने मारहाण करीत कोयत्याने डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केल आहे.
ही घटना (दि १९) रात्री ०१.०० च्या सुमारास हनुमान जिम शेजारी, पिंपरी येथे घडली. अल्पवयीन तरुणाने निष्पन्न आरोपी १) सेलविंग राजन नायडु (वय २० वर्षे रा. पाचपीर चौक गणपती मंदिराजवळ काळेवाडी), २) अभिषेक महेश देशींगकर (वय २५ वर्षे रा. पिंपरीगाव) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
पिंपरी पोलिसांनी ४६७/२०२४ भा.दं.वि. कलम ३०७,३२३, ५०४,३४ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. सपोनि देशमुख तपास करीत आहेत.















