न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२४) :- घरकामास असलेल्या महिलाने घरातील लोखंडी कपाटामधील सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. त्यामध्ये १,२०,००० रु. किं.ची अंदाजे ४० ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन, त्यास एक गोल पेंडन्ट, २) ३०,००० रु.किं.ची अंदाजे १० ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन, ३) ४५,००० रु.किं.ची अंदाजे १५ ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन, ४) ३०,००० रु.किं.ची अंदाजे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र त्यामध्ये काळे मणी असलेले व डायमंड पेंडन्ट असलेले, ५) २४,००० रु. किं.चे अंदाजे ८ ग्रॅम वजनाचे तीन सोन्याच्या अंगठ्या असे २,४९,००० रुपये किंमतीचे दागिने चोरी करुन नेले आहेत.
हा प्रकार (दि. २०/०५/२०२२ ते दि. ०४/०२/२०२४) दरम्यान फिर्यादीच्या राहते घरी पार्क स्ट्रिट, वाकड येथे घडला.
फिर्यादी बानिया रविशंकर रामकृष्णन (वय ४३ वर्षे) यांनी महिला आरोपी (वय-४४ वर्ष, रा. पडवळनगर, थेरगांव) हिच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ६२८/२०२४ भा.दं.वि कलम ३८१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि सुर्यवंशी तपास करीत आहेत














