- मोशीतील भारत माता चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरवर दरोड्याचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२४) :- मोशीतील भारत माता चौकातील एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर दोघांनी फोडण्याचा प्रयत्न केला. चोरी करण्याच्या उद्देशाने आत प्रवेश करुन त्यांनी एटीएम सेंटर मधील कॅमेरे लाकडी दांडक्याने तोडुन, एटीएम मशीनचा दरवाजा, प्रेझेंटर, मॉनीटर व सेफ्टीकुलुप तोडले.
ही घटना (दि.२१) रोजी रात्री ०१.५० वाचे सुमारास घडली. उमेश लक्ष्मण लामखडे यांनी दोन अनोळखी इसम (त्यांचे वर्णन १) एकाने अंगात पिवळया रंगाचा शर्ट घातलेला, डोक्याचे केस बारीक, डोळे मोठे, मिशी राखलेली, २) दुसरा इसम अंगात निळया रंगाचा टी शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट घातलेला) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २६०/२०२४ भा.द.वि कलम ३७९, ५११, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पानसरे तपास करीत आहेत.