न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२४) :- वाढदिवसाकरता केक आणला नाही म्हणुन फिर्यादीच्या भावाने आरोपी क्रं १ याच्या कानाखाली मारल्याचा राग मनात धरला. आरोपी क्र १ याने लाकडी दांडके फिर्यादीच्या भावाच्या डाव्या गालावर मारुन जबडा फॅक्चर केला.
तसेच भावाचा मित्र बाबा शेख यास लाकडी दांडक्याने मारले. आरोपीचा मित्र (नाव माहिती नाही) याने लोखंडी कोयत्याने फिर्यादीचा भाऊ अनिल यास ‘थांब आता तुला जिवंत सोडत नाही तुला संपवुनच टाकतो’ असे म्हणुन डोक्यावर जोराचा वार करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
भाऊ अनिलचा मित्र बाबा शेख यास आरोपी क्र १ व २ व त्यांचे इतर चार अनोळखी साथीदारांनी लाथाबुक्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे, असं फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि.२०) रोजी रात्री साडेआठ वा चे सुमारास रिलॅक्स मेडीकल समोर, शिवाजीवाडी चौक, मोशी येथे घडला.
महीला फिर्यादी (वय १८ वर्ष) हीने आरोपी १) रोहन रविंद्र नजन (वय २० वर्ष रा. शिवाजीवाडी मोशी), २) ऋषिकेश नागनाथ तेलंग (वय १९ वर्ष) व त्यांचे ३) चार अनोळखी साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीसांनी २५८/२०२४ भादवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) व महा. पो अधि. ३७ (१) सह १३५ प्रमाणे सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पठारे तपास क्र आहेत