न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२४) :- नवी सांगवीतील सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालय यांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध जयंती विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी झाली.
जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुनी तथागत गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंती निमित्त परिवर्तनवादि, विज्ञावादी, व समतेचा विचार पेरणाऱ्या सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, अहिल्या देवी होळकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संयुक्त जयंती महोत्सवातून विनम्र अभिवादन करण्यात आले.
विविध क्षेत्रातील मान्यवर सन्मानितांच्या गौरव सोहळ्यातून अरुण पवार (वृक्षमित्र) विनायक बडदे, (सर्पमित्र) यशोधरा नितनवरे, संतराम निकाळजे, विजय चौधरी, शिवानंद तालीकोटी यांचा भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देऊन सन्मान करण्याल आला.
याप्रसंगी प्रकाश खुड़े, महेंद्र कदम, अॅड. वसंत जाधव, गौतम डोळस, सुरेंद्र जाधव, निखिल चव्हाण, गजानन कांबळे, मानसिंग कांबळे, उज्वला जाधव, भारती भालेराव, विजया सोंडे, इंदुमती पवार, सुरेखा कनवाळू, उषा शिंदे, शोभा सावंत, मिरा शिंदे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यास. मगन सावंत, दिलीप शेलार, हनुमंत सोनावणे, सुनील जावळे, सिद्धार्थ मराडे, गुलाब गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.











