न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव स्टेशन (प्रतिनिधी) :- मावळ ॲग्रो व फार्मटच बायोटेक प्रोडयुसर कंपनीच्या वतीने (दि. 27) रोजी पहिल्या पिढीचे इंद्रायणी बीज (भात) बियाणे वाटप तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने वडगाव येथे करण्यात येणार आहे.
तालुक्यातील 30 ते 35 शेतकऱ्यांना प्रत्येकी 1 एकरसाठी 25 किलो या हिशोबाने 1000 किलो बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मावळ ॲग्रोचे संस्थापक माऊली दाभाडे यांनी दिली.
माऊली दाभाडे पुढे म्हणाले की, मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठ, शेती समृध्द करण्यासाठी व आरोग्यवर्धक समाज यांच्या पायाभरणाची जबाबदारी मावळ ॲग्रोच्या माध्यमातून घेतली जाईल. सेंद्रीय खताचा वापर करून तयार केलेल्या पहिच्या पिढीचे इंद्रायणी बीज हे भात खरेदी प्रति किलो 45 रूपये, तर सेंद्रीय खताचा वापर करून तयार केलेले इंद्रायणी भात खरेदी प्रति किलो 40 रूपये राहील.











