न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२४) :- घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरांना पोलीसांनी अटक केली असून घरफोडीचे ९ गुन्हे उघड करण्यात हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.
१) दयामान्ना यल्लाप्पा शिवपुरे (वय-४२ रा. शिवाजीनगर दत्तमंदीराचे मागे, देहुरोड), २) दुर्गाप्पा श्रीक्रिष्णा श्रीराम (वय-४५ रा. शिरालींग नगर जुना बिडी घरकुल सोलापुर) असं अटक आरोपींची नावे आहेत.
त्यांना (दि. २४) रोजी सापळा लावून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे काही दागिने त्यांनी काढून दिले. त्यांचेकडुन एकुण १० तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तसेच चांदीचे दागिने असे एकुण ४,८०,००० रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला असुन ०९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.














