न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२४) :- दोघेही वयाने १४ वर्षाखालील असताना बिर्यानी हाउस येथे आरोपी यांनी अल्पवयीन बालकांना कामावर ठेवून घेतले. त्यांच्याकडून काम करवून घेवून अपराध केला आहे.
हा प्रकार (दि. २७) रोजी दुपारी ३.३१ च्या सुमारास चाकणमधील एबी फेमस बिर्यानी हाउस येथील हॉटेलमध्ये घडला.
दिलशाद मिराज अली (रा. एबी फेमस बिर्यानी हाउस, यूनिकेअर हॉस्पीटल, चाकण) याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात ३५९/२०२४, बाल आणि किशोर कामगार अधियिकम १९८६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहवा चव्हाण पुढील तपास करीत आहेत.














