- थेरगावच्या इरिच इंटरनॅशनल कंपनीकडून आर्थिक फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२४) :- शेअर मार्केट ट्रेडींग करुन गुंतवणुकदार यांना चांगला परतावा देतात, अशी जाहिरात वाचून फिर्यादी यांनी आरोपीशी संपर्क साधला. कंपनीत पैशाची गुंतवणुक करण्यास फिर्यादीला भाग पाडले. गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगुन फिर्यादी यांनी गुंतविलेल्या गुंतवणुकीवर काही प्रमाणात परतावा देत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांचा मुलगा व मुलगी यांनी आरोपी क्र १ या मध्ये गुंतवणुक केली असता त्यांना सुरवातीला थोडे व्याज दिले. आरोपीत यांनी फिर्यादी व इतर गुंतवणुकदार यांनी गुंतविलेल्या पैशातुन स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी इतरत्र गुंतवणुक करुन कंपनी, जमीन, गाडी, ऑफीस खरेदी करुन स्वतःचा अर्थिक फायदा करुन घेतला. फिर्यादी यांनी गुंतविलेल्या पैशावरील करारनामा (वचनचिठ्ठी) प्रमाणे व्याज मागितले असता त्यांना ते देण्यास टाळाटाळ करुन उडवा उडवीची उत्तरे देत फिर्यादी व इतर गुंतवणुकदार यांनी विश्वासाने ४९,००,००० रु गुंतविलेल्ये रकमेचा अपहार करुन फिर्यादी व इतर गुंतवणुकदार यांची अर्थिक फसवणुक केली आहे. तसेच फिर्यादी व इतर गुंतवणुकदार यांच्याकडून स्वीकारलेल्या गुंतवणुकीवर शासनास जीएसटी न भरता शासनाची फसवणुक केलेली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार ०१ जुन २०२२ ते दिनांक २९/०५/२०२४ रोजी एबीसी, निर्माण बिल्डींग, संतोष नगर, थेरगाव व स्पॉट १८ कमर्शियल प्रिमायसेय, साई चौक, जगताप डेअरी चौक, रहाटणी येथे घडला. \
फिर्यादी ज्ञानेश मुरलीधर देवडे (वय ६१ वर्षे, धंदा निवृत्त) यांनी आरोपी १) इरिच इंटरनॅशनल कंपनी, २) प्रदीप मारुती शेळके (अंदाजे वय ५० वर्षे, रा. संतोष नगर, थेरगाव), ३) शहाजी दत्तात्रय बारणे( अंदाजे वय ४४ वर्षे, रा. पदमजी पेपर मिल जवळ, थेरगाव) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. \
वाकड पोलिसांनी ६७०/२०२४ भा.दं.वि कलम ४२०, ४०६, ३४ व सह महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय आस्थापनांमधील) हितसंबंधाचे रक्षण कायदा १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पोटे तपास करीत आहेत.















