न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२४) :- सोने खरेदीसाठी गि-हाईकांकडुन घेतलेले पैसे फिर्यादीने आरोपीच्या कंपनीच्या खात्यावर पाठविले. जमा असलेल्या पैशांचे सोन्याच्या किंमतीचे बील बनवून दिले. परंतु सोने दिले नाही. बिलामध्ये चुक आढळल्याने ते बील रद्द करुन दुरुस्ती करुन सोने पाठवितो, असे आरोपी यांनी फिर्यादीला सांगितले. परंतु त्यांनी सोने पाठविले नाही. फिर्यादी यांनी पैशाची मागणी केली असता पैसेही परत केले नाहीत.
फिर्यादी यांनी ईमेलव्दारे मागणी केली. एलएलपीचे भागीदार आरोपी २ व १ यांच्याकडे आजपर्यत बीलाप्रमाणे सोन्याची मागणी केली. परंतु त्यांनी ‘आज आम्ही गोल्ड एक्झीवीशनच्या गडबडीत आहोत, सोने पाठवुन देतो, नविन बील तयार करुन फिक्स रेट ६६५० या बाजारभावाने २ किलो ५५० ग्रॅम सोने सिक्वेल लॉजीस्टीक कंपनीकडे पाठवुन देतो’, असे सांगितले. भांबुर्डेकर सराफ अॅण्ड ज्वेलर्स खराडी व बीएसजे बुलीयन यांचा व आरोपी क्र १ यांचा व्यवहार बंद असताना बॉम्बे बुलीयन मेटल हब कंपनीचे मालक यांनी सोने पाठवुन देणे गरजेचे असताना त्यांनी २ किलो ५५० ग्रॅम सोन्याची वेगवेगळी दोन बीले बनवुन बीलाप्रमाणे सोन्याची डिलीव्हरी न देता फिर्यादी यांची जमा असलेली रक्कम १,८७,६६,५९७ रुपयाची आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.२७/१०/२३ ते दि.३०/०३/२०२४) दरम्यान फिर्यादीच्या राहते घरी, इंद्रायणीनगर, भोसरी व भाबुर्डेकर सराफ अॅण्ड ज्वेलर्स, भोसरी येथे घडला. फिर्यादी विलास महादेव भांबुर्डेकर (वय ६० वर्ष मुंबई), २) विनेश प्रितम जैन (वय २५ वर्ष धंदा व्यवसाय रा. मुंबई) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी २७६/२०२४ भादवि कलम ४०६,४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउनि इंगळे तपास करीत आहेत.











