न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२४) :- रेल्वेचे एरनाकुलम टाउन ते पुणे रिटर्नचे बुकिंग तिकीट रद्द करण्यासाठी गुगल वेबसाइटवर जाऊन ‘हाऊ टू कॅन्सल रेल्वे तिकीट’ हे सर्च केले.
एका अज्ञात इसमाने फिर्यादीकडून त्यांच्या खात्याची माहिती घेऊन त्या खात्यावरती तुमचे रद्द झालेले तिकीटाचे पैसे जमा होतील, असे सांगितले. आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईल व्हॉट्सअप वरती त्याचा मोबाईल नंबरवरून CustomerSupport_d4.apk ही वेबसाईट पाठवली. ‘Any Desk’ हे अँप डाउनलोड झाले व त्या अँपद्यारे त्या अज्ञात इसमाने फिर्यादी यांची एकुण ९७,८०५ रु. आर्थिक फसवणूक केली आहे.
हा प्रकार (दि.०३/०२/२०२४) रोजी डोळसनाथ मंदिर जवळ व श्री डोळसनाथ आळी, शुक्रवार पेठ, तळेगाव दाभाडे ता. मावळ येथे घडला. फिर्यादी (वय ६३ वर्षे व्यवसाय सेवानिवृत्त) यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी ३०६/२०२४ भादवि कलम ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६८, ६६ D प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मसपोनि क्षिरसागर पुढील तपास करीत आहेत.











