- प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी २५ जूनपर्यंत अर्ज भरता येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२४) :- तंत्रनिकेतन पदविका (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रियेला गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या प्रवेशप्रक्रियेंतर्गत शहरातील सुमारे २ हजार जागा भरण्यात येणार आहेत.
तंत्रनिकेतन पदविका (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी २५ जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. शहरामध्ये ५ ते ६ पॉलिटेक्निक
महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता सुमारे २ हजार विद्यार्थ्यांची आहे. तंत्रशिक्षणातील सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन, कॉम्प्युटर, आयटी,केमिकल, ईएनटीसी, अॅटोमोबॉईल आदी पदविका अभ्यासक्रम तेथे येतात. या शिकविण्यात अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार आहेत. प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज, ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन, छायांकित प्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया करता येणार आहे. दहावीनंतरचे कमी कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी आणि त्यानंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी हे अभ्यासक्रम उत्तम पर्याय मानले जातात. पदविका प्रवेशासाठीचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेशप्रक्रियेचा तपशील, माहितीसाठी तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संचालनालयाच्या तंत्रशिक्षण hrrqt://dte.mahararhrta .gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक…
अर्ज करणे : २९ मे ते २५ जून
कागदपत्रांची पडताळणी : २९ मे ते २५ जून
तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे : २७ जून
तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप : २८ ते ३० जून
अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे : २ जुलै
पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक महाविद्यालयात ६ अभ्यासक्रमांच्या एकूण ५३६ जागा आहेत.
– डॉ. शीतलकुमार रवंदळे, अधिष्ठाता, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट…