न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२४) :- काळेवाडीतील कपड्याच्या आणि पेपर प्लेट बनवणाऱ्या कारखान्याला आज सोमवारी (दि. ०३) रोजी सकाळी अकराच्या सुमारास भीषण आग लागली.

घटनेची माहिती कळताच पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल काही वेळातच घटनास्थळी पाेहचला. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवले जात आहे. ज्या ठिकाणी आग लागली त्या गोडाऊनमध्ये गॅस सिलिंडरचे स्फोट देखील होत हाेते.
आगीचे धूर आकाशात सर्वत्र पसरले होते. आगीत कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले असून मोठ आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जीवितहानीचे झाली की नाही? याबाबत सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…











