न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२४) :- ‘तू माझ्या बहिणीला पळुन जाताना मदत केली’ असे म्हणत आरोपी मित्राने तरुणाला लाकडी काठी डाव्या हातावर मारली. त्यात तरुणाचा डावा हात फॅक्चर झाला आहे.
‘मी असे काही केले नाही’ असे त्याचा मित्र म्हणत असताना देखील आरोपी मित्राने तरुणाला मारहाण केली आहे. हा प्रकार (दि ०६) रोजी सकाळी १०.३० वा तळेगाव चौक, चाकण येथे घडला.
अजिंक्य रमेश डौले (वय २२ वर्ष धंदा अॅब्युलन्स चालक, रा. नाणेकरवाडी) याने आरोपी बळेश्वर पाटील (रा नाणेकरवाडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी ३९३/२०२४ भादवि ३२६ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. पोहवा हांडे तपास करीत आहेत.