न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२४) :- दोन वर्षाकरीता तडीपार असताना तडीपार आदेशाचा व शस्त्रे हत्यारबाबत मनाई आदेश धुडकावत बेकायदा धारदार लोखंडी कोयता हत्यार जवळ बाळगुन मनाई आदेशाचा भंग केला.
पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने (दि ०६) रोजी दुपारी २.४५ च्या सुमारास बाळुमामा एंटर प्रायजेस समोर, तळवडे रोड, गणेशनगर, चिखली येथे कारवाई करीत सुरज भगवान चोपडे (वय २१ वर्षे रा. सप्तश्रृंगी हौसिंग सोसायटी, रुपीनगर चिखली) याला अटक केली आहे.
त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात ३२६/२०२३ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनि १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ १४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मासाळ तपास करीत आहेत.