न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०२४) :- काळेवाडी ज्योतिबानगर येथील डेलीसिअस पूना बेकर्ससमोरील रस्त्यावर मधोमध रस्त्याचे काम करत असताना खड्डा पडला आहे. या खड्ड्यामध्ये तीन ते चार दिवसात अंदाजे १०० ते १५० दुचाकी या खड्ड्यामध्ये आदळून काही लोक जखमी झाले, तर काहींना मुका मार लागला आहे.
याबाबत महानगरपालिकामध्ये तक्रार करून देखील अद्याप कोणीही तक्रारीकडे लक्ष दिले नाही. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता तेथील युवकांनी पुढाकार घेऊन त्या खड्ड्याच्या बाजूला लोखंडी बॅरिकेट उभे केले.
यावेळी युवा नेते रुपेश तापकीर, रुपेश मोरे, ॲड. योगेश नढे, राहुल ढोणे, सूरज पवार, कुणाल पाटील, पांडू राजुरे, महेश काळे, रोहित भोरे या सर्व युवकांनी एकत्र येऊन बॅरिकेट लावले. बॅरिकेट लावल्यानंतर तेथे वाहनचालक सावध झाले आहेत. प्रशासनाने शहरामध्ये जिथे जिथे असतील खड्डे त्वरित बुजवावेत. सध्या पावसाचे दिवस असल्याकारणाने खड्डे दिसून येत नाहीत.














