न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२४) :- रस्त्यावर अनाधिकृतपणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करत असताना आरोपी क्र १ हिने महिला सुरक्षा रक्षकाला हाताने मारहाण अन शिवीगाळ केली. तसेच आरोपी क्र २ याने महिला सुरक्षा रक्षकाच्या गणवेशाची गच्ची पकडून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली व हाताने मारहाण करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे.
ही घटना (दि. १४) रोजी दुपारी १२:०० च्या सुमारास दापोडी रेल्वेगेट, दापोडी येथे घडला. फिर्यादी सचिन विष्णु भारती ( स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पिंपरीचिंचवड महानगरपालिका) यांनी आरोपी १) महिला आरोपी २) महिला आरोपीचा मुलगा (पुर्ण नाव पत्ता माहित नाही, दोघे रा. दापोडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ३७९/२०२४ भा.दं.विकलम ३५३, ३५४ (अ), ३२३, ५०४,३४ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. मसपोनि गुजर पुढील तपास करीत आहेत.