- दुय्यम निबंधक कार्यालयाकडून दखल; महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२४) :- पिंपरी वाघिरे येथील स.न १५६ अ/२ मधील ९० गुंठे मिळकतीचे मालक महेश्वरी आणि कंपनीचे अधिकृत भागीदार १) श्रीमती सावित्री मोहनदास वाधवा, २) लिलाराम हिंदोमल कृपलाणी, ३) हरीराम मोहनदास वाधवा व ४) हरदासमल एन. देवनानी आहेत. यापैकी लिलाराम हिंदोमल कृपलाणी हे (दि. २१/१०/१९८१) मयत झालेले आहेत. फसवणुक करण्याच्या उद्देशाने महिलेने मयत लिलाराम हिंदोमल कृपलाणी यांच्याकडून उपरोक्त मिळकतीबाबत स्वतःचं नावे बनावट कुलमुखत्यारपत्र बनविले. या कुलमुख्यत्यारपत्राच्या आधारे स्वतःचे पती कश्यप हरीराम वाधवा (मयत सन २०१२) यांचे नावे स.न १५६ अ/२ मधील ९० गुंठे मिळकती मधील २२.५ गुंठे क्षेत्राचे बक्षीसपञ दस्त रजिस्टर क्र. ७७१३/२००६ दिनांक २९/०९/२००६ रोजी अन्वये शासनाची दिशाभूल करुन नोंदणीस आणले.
महेश्वरी आणि कंपनीचे अधिकृत भागीदारांचे वाली वारस यांची रक्कम ४६,९०,००० रु. (सध्याचे बाजारमूल्य ३,८३,५५,५००/-रु.) ची फसवणूक केली आहे. हा प्रकार (दि २७/०९/२००६ ते २९/०९/२००६) दरम्यान सह दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्र.५, पिंपरी चिंचवड येथे घडला.
फिर्यादी सह दुय्यम निबंधक वर्ग-२, हवेली क्र.५, पिंपरी चिंचवड यांनी महिला आरोपी (रा, माहिम, मुंबई) हिच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चिंचवड पोलिसांनी २६०/२०२४ भा.दं.विकलम ४२०,४६५, ४६७,४६८, ४७१ सह नोंदणी अधि. १९०८ चे कलम ८२ प्रमाणे महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि सकट आर्थिक गुन्हे शाखा हे पुढील तपास करीत आहेत.