न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२४) :- तिघांनी आपआपसांत संगणमत करीत पैसे इन्वेस्ट केल्यास तीन पट पैसे मिळतील, असे आमिष दाखवले. फिर्यादीची एकुण २,१०,००,००० रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि १३/०१/२०२४) रोजी दुपारी १२:०० ते आजपर्यंत रावेत येथे घडला. पुरुष फिर्यादी (वय ४६ वर्षे सायकल व्यवसाय) यांनी आरोपी १) फेसबुक आयडी धारक सोनी साह, २) व्हॉटसअॅपनंबर धारक ६०२६३०५४७३ ३) बँक अकाऊंट धारक (नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
रावेत पोलिसांनी २६८/२०२४ भादवि कलम ४१९,४२०, ३४ माहीती तंञज्ञान अधि ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मपोहवा मेहता पुढील तपास करीत आहेत.