- विविध संस्था, मंडळांना मंडप परवानगी विनासायास द्या..
- भाजपचे सचिन काळभोर यांनी पालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२४) :- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे (दि. २९) रोजी पिंपरी चिंचवड शहरात आगमन होणार आहे. शहरात पालखी सोहळा येताच हेलिकॉप्टरने त्यावर पुष्पष्टी करावी. त्यामुळे पालखी सोहळा हर्षोल्हासात साजरा होईल.
याशिवाय या पालखी सोहळ्यात विविध सेवा-भावी संघटना-संस्था, मंडळे वारकरी बांधवांना अन्नदान, मोफत वैद्यकीय उपचार आणि औषधांचे वाटपही करीत असतात. त्यांना सुरक्षा कारणास्तव पोलिस प्रशासन मंडप परवानगी देत नाही. काही वेळा मंडप काढून टाकण्याचा प्रकारही घडतो.
यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड शहर पोलिस यांनी समन्वय राखून विविध संस्था, मंडळ यांना मंडप परवानगी विनासायास द्यावी त्यांना सुरक्षा कारणास्तव वैठीस धरु नये, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.