न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२४) :- चिखलीतील पूर्णानगर, कृष्णानगर, घरकुल नेवाळे वस्ती या भागात वारंवार विजपुरवठा खंडित होत आहे. पूर्णानगर येथील महावितरण कार्यालयामध्ये शहर भाजपच्या वतीने महावितरणचे कनिष्ठ अभियंता विकास पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस अजय पाताडे, शहर उपाध्यक्ष पोपट हजारे, प्रभाग अध्यक्ष संतोष ठाकूर, मंडल सरचिटणीस गोरख पाटील, सागर देसाई, मनाली पताडे, कार्तिक धुरी, मेहेश मांडवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते
एक महिना लाईट बिल उशिरा भरल तर, लाईन कट करायला येता. व्यापाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान याचा आपण कधी विचार करणार? असा सवाल नागरिकांनी यावेळी अधिकाऱ्यांना केला. दर दिवशी कुठे ने कुठे, काही ना काही फॉल्ट होत असतो, पावसाळ्यात तर याचे प्रमाण अजूनही वाढू शकते. त्यामुळे या भागातील पावसाळी दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करून घ्यावे, आठवड्यातला गुरुवार हा एक दिवस दुरुस्ती कामाकरिता असतो. नागरिक सहकार्य करतात. मात्र, वारंवार नागरिक सहन करणार नाहीत. सुधारणा झाली नाही तर, नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे.