- नवनियुक्त न्यायाधीशांचे नेहरूनगर न्यायालयात स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२४) :- पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने नवनियुक्त न्यायाधीशांचे नेहरूनगर न्यायालयात नुकतेच स्वागत करण्यात आले. पिंपरी न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ५ वरून १० झाली आहे.
यात नवनियुक्त न्यायाधीश व्ही. एन. गायकवाड, ए. एम. बगे, एम. ए. आवळे, बी. डी. चोखट, टी. एस. महाडिक, एस. एन. गवळी, अल अमुदी ए. के., एस. एस. चव्हाण यांचा समावेश होता. पिंपरी न्यायालयात आता दहा न्यायाधीश नियुक्त झाले आहेत.
पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये, एम. जी. मोरे उपस्थित होते.
असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. प्रमिला हरीश गाडे यांनी स्वागत केले. स्वागत समारंभास माजी अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ, सुनील कडूसकर, किरण पवार, माजी उपाध्यक्ष प्रतीक जगताप, पांडुरंग शिनगारे, अॅड. योगेश थांबा, अरुण खरात, बी. के. कांबळे, पूनम शर्मा, संगीता कुशलकर, पूनम राऊत, सविता तोडकर, संतोष मोरे आदी उपस्थित होते.
पिंपरी- चिंचवड अॅडव्होकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष गोरख कुंभार, महिला सचिव वर्षा तिडके-कांबळे, ऐश्वर्या शिरसाठ, सदस्य जयेश वाकचौरे, साक्षी धुमाळ यांनी संयोजन केले.