न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२४) :- पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे हे तेरा दिवसांच्या सुटीवर गेले आहेत. या कालावधीत कामकाजाचा पदभार राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद हे पाहणार आहेत. रामानंद यांनी शुक्रवारी (दि. १४) पदभार घेतला, असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह (दि. २८ जून) पर्यंत अर्जित रजेवर गेले आहेत. या कालावधीत त्यांचा कारभार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.
येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. दोन्ही आयुक्त एकाच महिन्यात लोकसभा निवडणुकीनंतर सुट्टीवर गेल्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या बदलीची चर्चा सुरु झाली आहे.


















