न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२४) :- निगडीतील शिवभूमी विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव सोहळा दरवर्षी प्रमाणे साजरा करण्यात आला. १ ली ते ४ थी च्या बाल चिमुकल्यांच्या हातात फुगे, कार्टून, फुले देवून विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षात आनंदात पदार्पण केले.
मुख्याध्यापिका पाटील अश्विनी यांनी विद्यार्थ्यांना तिलक लावून त्यांचे स्वागत केले. फुग्यांनी व फुलांनी सजवलेली शाळा, वाजणारा ढोल पथक सर्व शिक्षक वृंद पाहून विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या चेहऱ्यावर हास्य आनंद जाणवत होते. फुले उधळून विद्यार्थ्यांचे स्वागत झाल्यावर गाणी गोष्टी घेऊन परिपाठ पार पडला.
बालवर्गातून पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष भेट फुले देऊन त्यांचेही स्वागत इतर विद्यार्थ्यामार्फत केले. शाळेतील उपक्रमशील तंत्रशिक्षिका कोठेकर योगिता यांनी तयार केलेले सेल्फी पॉईंट विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरले.