न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२४) :- कॅनरा बँकेकेडून लिलावाद्वारे विकत घेतलेल्या फ्लॅटचा तिघांनी आप-आपसात संगणमत करुन बेकायदेशीरपणे लॉक तोडुन ताबा घेतला. बँकेकडून विकत घेतला असल्याचे फिर्यादी यांनी सांगून देखील त्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करीत स्वतःच्या फ्लॅटमधून हाकलुन लावले.
‘तु परत येथे आला तर तुला जिवे मारुण टाकतो व तुझ्यावरच खोटी केस करतो, फ्लॅट माझाच आहे, मी खाली करणार नाही, तुला काय करायचे ते कर.’ अशी धमकी त्यांना दिली, असं फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि.०२/०३/२०२४ ते दि. ०३/०३/२०२४) दरम्यान फ्लॅट नंबर ६, दुसरा मजला, शिवगंगा पार्क सेक्टर १६, चिखली येथे घडली.
फिर्यादी अजित बाबासाहेब सोनवणे (वय ३६ वर्षे) यांनी आरोपी १. अनिल गणपत गुंजाळ, २. महिला आरोपी, ३. मयुर अनिल गुंजाळ यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ३४७/२०२४ भा.द.वि. कलम ४४८,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. एम जी मुळीक पोलीस उप निरी. पुढील तपास करीत आहेत.