- दोन्ही ठिकाणी असा आहे पर्यायी मार्ग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२४) :- बकरी ईदनिमीत्त चाफेकर चौकातील ईदगाह मैदान येथे नमाज पठण करण्याकरीता मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. ईदगाह मैदानाकडे जाणारी व येणारी वाहतुक पर्यायी रस्त्याने वळविणे आवश्यक आहे.
तसेच भोसरी वाहतुक विभागाच्या हद्दीत बकरी ईदच्या अनुषंगाने मनपाकडुन अनुकुल फुल चौकाजवळ जे-५६ एमआयडीसी भोसरी येथे तात्पुरत्या स्वरुपात कत्तलखाना उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी जनावरांची खरेदी, वाहतुक व मांस घेवुन जाण्याकरीता व्यापारी, गि-हाईक व मुस्लिम बांधव आपल्या वाहनांनी येत असतात. त्यामुळे या परीसरात वाहनांची गर्दी होत असते.
चिंचवड वाहतुक विभागांतगर्त (दि. १७) रोजी पहाटे ०५.०० ते दुपारी १.०० वा. दरम्यान आवश्यकतेनुसार (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) अथवा वाहतुक सुरळीत होईपर्यंत वाहतुक बदल करण्यात येत असुन नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. वाहतुकीत असा आहे बदल
मरीआई माता मंदिर ते चाफेकर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग १ सदर मार्गावरील वाहतुक एस के एफ कंपनीकडून डाव्या बाजुस वळुन अहिंसा चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
पर्यायी मार्ग २ : सदर मार्गावरील वाहतूक मरीआई माता मंदीरापासून डाव्या बाजुस वळून अहिंसा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
चाफेकर चौक ते मरीआई माता मंदिर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग १ : सदर मार्गावरील वाहतुक ही चाफेकर चौक जुना जकात नाका कडून उजव्या बाजुस वळून सेव्हन ऑरेंज हॉस्पीटल मार्गे इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग २:- सदर मार्गावरील वाहतुक ही चाफेकर चौक कडून उजव्या बाजुस पळून अहिसा चौकाकडून इच्छित स्थळी जाईल.
बिजलीनगर ते चाफेकर चौकाकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
सदर मार्गावरील वाहतुक ही हनुमान मंदिर येथुन डावीकडे वळुन मरीआई माता मंदिर किंवा सेव्हन अरिंज हॉस्पीटल कडून इच्छित स्थळी जातील,
भोसरी वाहतूक विभागातांगर्त वाहतुक बदल हा (दि. १७ ते १८) दोन दिवस सकाळी ०६.०० या ते रात्री ९.०० या दरम्यान आवश्यकतेनुसार (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) अथवा वाहतुक सुरळीत होईपर्यंत वाहतुक बदल करण्यात येत असुन नागरीकांती पर्यायी करावा.
अनुकुल चौक ते क्वालीटी आईसक्रिम चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने टेल्को रोडवरील गवळीमाथा/हनुमान मंदीर चौक ते ऑरलीक कंपनी चौक व पुढे क्वालीटी आईसक्रिम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.