न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२४) :- मोपेडवरुन जाताना समोरुन आलेल्या दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांनी दुचाकी आडवी लावुन सोसायटी अध्यक्षाच्या टी शर्टची गचंडी पकडली. “तुच सोसायटीचा अध्यक्ष आहे ना, तुझ्यामुळे माझ्या नातेवाईकांना फ्लॅट भाडयाने मिळत नाही” असे म्हणत त्यांच्या गळयातील ५०,००० रुपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारुन चोरली.
कपाळावर हातातील कडयाने मारुन जखमी करुन दुचाकीवरुन मोशीच्या दिशेने पळुन गेले. हा प्रकार (दि. १५) रोजी रात्री ९.१५ च्या सुमा. विक्रांत नर्सरी समोर, आल्हाटवस्ती, पुणे-नाशिक रोड, मोशी येथे घडली.
याप्रकरणी अमोल एकनाथराव नागपुरकर (वय ४१ वर्ष, रा. अल्पाईन औरा सोसायटी, बनकरवस्ती, मोशी) यांनी आरोपी दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ३०२/२०२४ भा.दं.वि कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि इंगळे पुढील तपास करीत आहेत.