न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस भरती २०२२-२०२३ प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांचे शारीरीक मोजमाप व मैदानी चाचणी संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल, इंद्रायणीनगर, भोसरी येथे (दिनांक १९/०६/२०२४ ते दिनांक २४/०६/२०२४ व दिनांक ०१/०७/२०२४ ते १०/०७/२०२४) दरम्यान पार पडणार असुन या ठिकाणी वाहतुक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहतुक बदल करणे आवश्यक आहे.
सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, इ. वगळून) आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येत असून नागरीकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. आदेशाची अमंलबजावणी दिनांक १९/०६/२०२४ रोजी ते दिनांक २४/०६/२०२४ व दिनांक ०१/०७/२०२४ ते दिनांक १०/०७/२०२४ रोजी पहाटे ०४.०० वा. ते दु. ४.०० वा. दरम्यान दिनांक २३/०६/२०२४ व दिनांक ०७/०७/२०२४ रोजीची शासकीय सुट्टी वगळून लागु करण्यात येत आहे.
दरम्यान भोसरी इंद्रायणीनगर महादेव मंदिर ते श्री स्वामी समर्थ सी.बी.एस.ई स्कुल गेट नं-२ दरम्यानचे रस्त्यावरुन सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या-जाण्याकरीता मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- १. भोसरी तिरुपती (सहारा) चौकाकडुन इंद्रायणीनगर स्वीट कॉर्नर चौकाकडे येणारी वाहतुक श्री स्वामी समर्थ सी.बी.एस.ई स्कुल गेट नं २ येथे उजवे बाजुस वळुन इंद्रायणीनगर पोलीस वसाहत मिनी मार्केट मार्गे रामकृष्ण मोरे प्रवेश व्दारातुन बाहेर पडुन इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग :- २. भोसरी इंद्रायणीनगर स्वीट कॉर्नर चौकाकडून तिरुपती चौकाकडे जाणारी वाहतुक महादेव मंदीर येथुन डावे बाजुस वळुन रामकृष्ण मोरे प्रवेशव्दारातुन मिनी मार्केटच्या पुढे राकेश स्वीट मार्गे इच्छित स्थळी जातील.