- मुदतीमध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन; दोन वर्षात मिळणार ताबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२४) :- चिंचवड येथील महानगरपालिकेच्या आरक्षण क्र. १८१ ड या जागेवर नविन प्रशासकिय इमारत बांधण्याचे काम करण्यात येत आहे. या इमारतीच्या भूखंडाचे क्षेत्र ८.६५ एकर (३७२३२.२५ चौ.मी.) एकूण बांधकाम क्षेत्र ९१४५९ चौ.मी. (सुमारे १० लाख चौ. फूट). नविन प्रशासकीय इमारतीमध्ये पुढील प्रमाणे ४ विंग बांधण्यात येणार आहेत.

A विंग :- ३ तळघर + तळमजला + ६ मजले, B विंग :- ३ तळघर + तळमजला + १८ मजले, C विंग :- ३ तळघर + तळमजला + १८ मजले D विंग :- ३ तळघर + तळमजला ६ मजले. तसेच या इमारतीमध्ये महापालिका सर्वसाधारण सभागृह, सुसज्ज असे ग्रंथालय, प्रदर्शन दालन, बहु उद्देशीय सभागृह,नागरिक व कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी साठी क्लिनिक,ए टी एम सेंटर, इ-गव्हर्नन्स, नागरी सुविधा केंद्र, सुरक्षा कक्ष, कोर्टयार्ड, स्वच्छतागृह, स्वागत आणि माहिती कक्ष, कॅन्टीन व पत्रकार बांधवासाठी पत्रकार कक्ष इ. बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
या इमारतीची रचना पर्यावरणपूरक (Eco-friendly Building) असून त्यामध्ये जलपुनर्भरण, सौर उर्जेचा वापर, पाण्याचा पुर्नवापर, Climate Responsive Gl fins, Natural Ventilation, Green areas, स्कायलाइट, दोन व चार चाकी मिळून सुमारे ५ हजार वाहने पार्किंग इ. बाबींचा समावेश करणेत आलेला आहे. इमारतीची उंची ८३ मी. एवढी आहे. इमारत पुर्ण झाल्यानंतर नागरीकांना महानगरपालिकेची सर्व विभागाची कार्यालये एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून महानगरपालिकेच्या कामाकाजात सुसुत्रता येणार आहे.
कामाचा आदेश जानेवारी २०२३ मध्ये देण्यात आले असून कामाची मुदत ३६ महिने अशी आहे. स्वीकृत निविदा र.रू.२८६.६३ कोटी इतकी आहे. में के. एम. व्ही. प्रोजेक्ट्स हे ठेकेदार असून सुनिल पाटिल असोसिएट प्रा.ली.हे कामाचे सल्लागार आहेत.
“सद्यस्थितीत २०% काम पूर्ण झाले असुन इमारतीचे संपुर्ण खोदकाम व फाऊंडेशनचे काम पुर्ण झालेले असून आता सर्वात खालील तळघराच्या स्लॅबचे काम प्रगतीपथावर आहे. स्लॅब वरील कॉलमचे काम पावसाळ्यात करणे शक्य होणार आहे. मुदतीमध्ये काम पूर्ण करणेचे नियोजन आहे”
– प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता प्रकल्प विभाग..











