न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२४) :- डेंग्यू, मलेरिया, टायफडसारखे आजार शहरात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. टायफड हा संसर्गजन्य रोग आहे. अनेक जणांना या रोगाची लागण होत आहे. हजारो विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत.
त्यांना बाधा होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेत आरोग्य तपासणी शिबीर तसेच सर्व शाळेतमध्ये धूर फवारणी आणि औषध छिडकाव करावा. शाळेत जाऊन याबाबत तपासणी आणि उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी मा. स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडे केली आहे.