न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०२४) :- रावेत येथील सर्व्हे नंबर ७७/९ मधील ४० आर मिळकत खरेदी देण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादीबरोबर जमिन विक्री व्यवहार संदर्भात समजुतीचा करारनामा केला. फिर्यादींकडुन २५,००,००० रु. स्विकारुन जमिनीचा व्यवहार पुर्ण करुन दिला नाही.
फिर्यादींचे २०,००,००० अधिक नुकसान भरपाईचे ५,००,००० रु असे एकुण २५,००,००० रु. परत न करता त्यांची आर्थीक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी फिर्यादी नामदेव शंकर पोटे (वय ७५ वर्षे, व्यवसाय बांधकाम व्यवसाय) यांनी आरोपी बाळासाहेब दत्तात्रय गवारे (वय ५० वर्षे, व्यवसाय रियल इस्टेट, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
रावेत पोलीस ठाण्यात २७४/२०२४ भा.द.वि.स. कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वपोनि महेंद्र कदम पुढील तपास करीत आहेत.