- पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना औषध, केळी अन बिस्किटांचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२४) :- विठू नामाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत तुकाराम महाराजांच्या 339 वां पालखी सोहळ्यास प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निगडी येथे सोहळ्यास उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले.
यावेळी, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राम मंदिराची प्रतिकृती भेट देवून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी, आमदार अश्विनी जगताप, उमाताई खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे, शहर चिटणीस सचिन काळभोर, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, कमल घोलप, तेजस्विनी कदम, राजेंद्र बाबर, बापू बाबर, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
निगडी येथे भाजपतर्फे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी स्वागत कमान उभारण्यात आली होती. यावेळी सचिन काळभोर यांच्या वतीने वारकऱ्यांना केळी तसेच चहा, नाश्ता, बिस्किटे, मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.